Tuesday, 5 February 2013

पोलीस शांतता समिती सदस्य व जेष्ठ पत्रकार शरद भसाले यांचा सत्कार करताना ठाणे पोलीस आयुक्त के पी रघुवंशी

Tuesday, 26 April 2011

आधार'च्या नोंदणीधारकाला शंभर रुपये मिळणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 26, 2011 AT 12:15 AM (IST)

भिवंडी -  देशातील सर्व नागरिकांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या "आधार' प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळावा, यासाठी भिवंडी महापालिकेने अनोखी शक्‍कल लढवली आहे. शहरात ही योजना यशस्वी करण्यासाठी दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील नोंदणीधारकांना प्रत्येकी 100 रुपये, तर सर्वसाधारण नोंदणीधारकांना प्रत्येकी 50 रुपये देण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती भिवंडी पालिका आयुक्‍त अच्युत डांगे यांनी सोमवारी दिली.

देशातील रहिवाशांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी केंद्राने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना केली आहे. येथील स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये महापौर यशश्री कडू, डांगे, आमदार रशिद ताहीर मोमीन, पालिकेचे सभागृह नेते सिद्धेश्‍वर कामूर्ती यांचे संगणकावर छायाचित्र, हाताचे ठसे आणि डोळ्याच्या बुब्बुळांचे छायाचित्र घेऊन या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी डांगे यांनी ही घोषणा केली. भिवंडीमध्ये रहिवाशांचे छायाचित्र आणि हातांचे ठसे घेण्याचे काम पालिकेने "महा ऑनलाईन प्रा. लि.' वर सोपवले आहे. हे ओळखपत्र मिळविण्यासाठी संस्थेचा अर्ज भरून बॅंकेचे पासबूक, वीज बिल, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका आदी कागदपत्रे पुराव्यादाखल सादर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नोंदणीधारकांना मानधन देण्याचा निर्णयही पालिकेने घेतला असून, भिवंडीवासीयांनी त्याचे स्वागत केले आहे. दरम्यान, या योजनेमुळे नागरिकांना विविध योजनांचा लाभ उठवता येणार आहे. या क्रमांकामुळे व्यक्‍तीला देशात कुठेही बॅंकेत खाते उघडणे अथवा अन्य सरकारी कामे करताना निर्माण होणारे अडथळे दूर होणार आहेत. त्यामुळे याचा लाभ उठविण्याचे आवाहन यशश्री कडू आणि मोमीन यांनी शहरवासीयांना केले आहे.

Monday, 25 April 2011

भिवंडीत वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

भिवंडीत वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Monday, April 25, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: accident,   bhiwandi,   mumbai

भिवंडी - भिवंडीहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी काल्हेर गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तानाजी मारुती शिंदे (वय 47) असे मृताचे नाव आहे. तानाजी शिंदे मोटरसायकलवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नारपोली पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या एका अपघातात मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावात एका भरधाव वाहनाने पादचाऱ्यास दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हायटेक पार्क परिसरात ही घटना घडली. मृताचे नाव समजू शकले नसून, तो 25 वर्षांचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपनिरीक्षक वाकोडे यांनी केले आहे.

Sunday, 17 April 2011

भिवंडीत एकाची हत्या

भिवंडी - भिवंडीतील नारायण कम्पाऊंड पद्मानगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास मच्छरदाणी लावण्यास विरोध केला म्हणून संतप्त झालेल्या सहकारी कामगारांनी एकाची हत्या केली. आनंद दुबे (22) असे मृत यंत्रमाग बिगारी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुबे हा एकाच खोलीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत होता. काल (ता. 15) रात्री साडेअकराच्या सुमारास मच्छरदाणी लावण्यावरून त्याचा सहकाऱ्यांबरोबर वाद झाला. या वेळी संतप्त झालेल्या हरी वर्मा याने आपल्या साथीदाराच्या मदतीने आनंद यास लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली; तसेच डोक्‍यावर वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी तेथून पळ काढला आहे. सुरेशकुमार सहानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By:

भिवंडीत एकाची हत्या

भिवंडीत एकाची हत्या
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 17, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: murder,   bhiwandi