भिवंडीत वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Monday, April 25, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: accident, bhiwandi, mumbai
भिवंडी - भिवंडीहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी काल्हेर गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तानाजी मारुती शिंदे (वय 47) असे मृताचे नाव आहे. तानाजी शिंदे मोटरसायकलवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नारपोली पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दुसऱ्या एका अपघातात मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावात एका भरधाव वाहनाने पादचाऱ्यास दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हायटेक पार्क परिसरात ही घटना घडली. मृताचे नाव समजू शकले नसून, तो 25 वर्षांचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपनिरीक्षक वाकोडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment