Sunday, 17 April 2011

भिवंडीत एकाची हत्या

भिवंडीत एकाची हत्या
 
 
भिवंडी - भिवंडीतील नारायण कम्पाऊंड पद्मानगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास मच्छरदाणी लावण्यास विरोध केला म्हणून संतप्त झालेल्या सहकारी कामगारांनी एकाची हत्या केली. आनंद दुबे (22) असे मृत यंत्रमाग बिगारी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुबे हा एकाच खोलीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत होता. काल (ता. 15) रात्री साडेअकराच्या सुमारास मच्छरदाणी लावण्यावरून त्याचा सहकाऱ्यांबरोबर वाद झाला. या वेळी संतप्त झालेल्या हरी वर्मा याने आपल्या साथीदाराच्या मदतीने आनंद यास लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली; तसेच डोक्‍यावर वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी तेथून पळ काढला आहे. सुरेशकुमार सहानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

No comments:

Post a Comment